पुणे, 26 जून: अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे शहर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 152 वी जयंती पुणे महानगरपालिकेत उत्साहात साजरी करण्यात आली.
महापौर सौ. मंजुषा नागपुरे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर सौ. नागपुरे यांनी शाहू महाराजांनी स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला. उपमहापौर मा. वाडेकर यांनी शाहू महाराजांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले, हे सांगून शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमास मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, मनपा गटनेते अँड. निलेश निकम, नगरसेवक निलेश अल्हाड, माजी नगरसेविका सौ. रेश्माताई भोसले, नामदेव मानकर, भास्कर हांडे, शहर अध्यक्ष युवराज दिसले, महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे, नगरसचिव योगिता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड व मराठा व्यवसाय आघाडी पुणे अध्यक्ष रणजीत बहिरट यांनी केले होते.
याप्रसंगी तानाजी शिरोळे, सुभाष जेधे, सचिन वडघुले, अतिष शेडगे, राकेश रेपाळे, रविंद्र मेमाणे, जितेंद्र कोंढरे, ज्ञानेश्वर कापसे, वेदांत घाडगे, अनिल बालवडकर, सौ. कामिनी मेमाणे, सौ. भाग्यश्री बोरकर, डॉ. मनिषा जाधव इ. पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















