कमला नेहरू हॉस्पिटल ची दुरावस्था; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

पुणे : कमला नेहरू हॉस्पिटल हे पुणे महानगरपालिकेच्या मालकीचे  पुणे शहरातील एकमेव मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने नुकतीच या हॉस्पिटल साठी करोड रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली. सदर इमारत बांधताना अनेक चुका केल्या गेल्या असून या चुकांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या  या इमारतीच्या पार्किंग मध्ये ड्रेनेज लाईन मधून मैलापाणी मोठ्या प्रमाणात जमा होत असून इमारत बांधताना केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे हा प्रकार घडत असल्याचे यावेळी नागरिकांनी बोलून दाखवले.

ड्रेनेज लाईन मधून बाहेर पडणारे मैलापाणी हे बेसमेंट मध्ये जमा होत असून त्याचा निचरा होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी हॉस्पिटलच्या नवीन इमारतीतील बेसमेंट मध्ये दुर्गंधी तसेच मच्छरांची पैदास वाढली आहे. याचा परिणाम रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. अशातच पावसाचे पाणी देखील सदर बेसमेंट मध्ये साठले जात असून हे पाणी काढण्यासाठी पाणी उपसायच्या पंपाचा वापर करावा लागत असून चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे यांनी या प्रश्न संदर्भात रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नसून हा सर्व प्रकार म्हणजे महापालिकेच्या तिजोरीला लुटून खाण्याचा प्रकार आहे. दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या महात्मा फुले वस्तीगृह मध्ये दोन विद्यार्थी डेंग्यू ने मृत्यू झाल्याची घटना घडली असून आणखी किती बळी घेणार हे प्रशासन हा प्रश्न निर्माण होतो.

पालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात झिका, डेंगू ,मलेरिया सारखा आजार पसरण्याची खूप मोठी भीती निर्माण झाली आहे.महापालिका प्रशासन काही जीवित हानी झाल्यावर जागी होणार  का ?  हा प्रश्न निर्माण होतो . असे मत आम आदमी पार्टीचे मीडिया सहसंयोजक श्री निरंजन अडागळे यांनी व्यक्त केले.

महानगरपालिकेतील कमला नेहरू हॉस्पिटल यामध्ये जो प्रकार घडत आहे हे पाहून पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर  मोठा प्रश्नचिन्ह नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. असे मत आम आदमी पार्टी युवा आघाडी सहसचिव ॲड. श्री गुणाजी मोरे यांनी व्यक्त केले.

हा प्रकार निंदनीय आहे, जीवघेणे प्रकार पालिकेकडून होत आहेत. ताबडतोप कार्यवाही केली नाहीं तर हेच घाण पाणी आयुक्तांच्या केबिन मध्ये ओतले जाईल – श्री सतीश यादव, महासचिव

See also  शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन शिक्षण वाचवण्यासाठी सरकार बदलण्याचे आवाहन


यावेळी उपाध्यक्ष श्री अनिल कोंढाळकर श्री शंकरजी थोरात , श्री बालाजी कंठेकर उपस्थित होते.