श्रीपाद महाराज-रामदास महाराज पालखी सोहळ्यास सात जुलै पासून प्रारंभ

पुणे, प्रतिनिधी : राष्ट्रीय संत श्रीपाद महाराज व रामदास महाराज पालखी सोहळा संस्थान, नेवाळेवस्ती (टाळगाव चिखली) यांच्या वतीने यंदाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्यात दिवंगत वै. ह.भ.प. आत्माराम लक्ष्मण राऊत यांच्या स्मरणार्थ सुजित शेठ आत्माराम राऊत यांना यंदाच्या रथाचे मानकरीपद बहाल करण्यात आले आहे.

संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज नेवाळे (श्रीक्षेत्र टाळगाव चिखली, नेवाळेवस्ती) यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता सद्गुरू पादुका अभिषेक व टाळपूजन होणार असून, सकाळी ८.३० वाजता संत श्रीपाद महाराज व संत रामदास महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान टाळ मंदिर, खेड येथून होईल. यावेळी टाळगाव चिखलीतून प्रस्थान प्रा.सदानंद मोरे, चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी विठ्ठल साळुंखे, देवीचे अकरावे वंशज प्रशांत मोरे,आमदार महेश लांडगे, टाळगाव प्रसादी दिंडीचे अध्यक्ष रोहिदास अण्णा मोरे, टाळगाव प्रसादिक दिंडीचे उपाध्यक्ष बाळासाहेब हरगुडे, आळंदी ते पंढरपूर संत श्रीपाद महाराज संत रामदास महाराज, पालखी सोळयाचे अध्यक्ष गोविंदजी घाडगे महाराज, आत्मा उन्नती विश्वशांती स्वानंद प्रेमा मंडळ, बाळासाहेब श्रीपती चव्हाण घोटी, रजुताई रामदास मधुकर कंद पाटील, देहू, तसेच दत्तात्रय दशरथ राऊत, जालिंदर राऊत, सुरेंद्र आत्माराम राऊत, बापूसाहेब कस्पटे, आळंदी देवाची सर्व अधिकारी पदाधिकारी पालखी प्रस्थानाच्या वेळी उपस्थित राहणार आहे.

यंदाच्या सोहळ्यास आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, विविध ह.भ.प., कीर्तनकार, वारकरी, भाविक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. सोहळ्यादरम्यान पारंपरिक भजन, कीर्तन आणि वारकरी संप्रदायाच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेच्या वतीने सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज नेवाळे यांनी केले आहे. संपर्क : ह.भ.प. तुकाराम नेवाळे – ८८८८५४१०००.

See also  पद्म श्री अनाथांची माता कै.सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील अनाथ आश्रमामध्ये डॉ.दिलीप मुरकुटे यांच्या हस्ते गणपती आरती