योगीराज पतसंस्थेच्या वतीने तुकाराम महाराज पालखी नवीन चांदीच्या रथाला देणगी अर्पण

बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने आषाढी वारी निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नव्याने बनविण्यात आलेल्या 251 किलो चांदीच्या रथाला 51 हजार रुपयांची देणगी देहू संस्थान चे विश्वस्त वैभव महाराज मोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी गुरूवर्य बाळोबा सुतार पाषाणकर दिंडीला अन्नदानासाठी 10 हजार रुपयांची देणगी देण्यात आली तसेच कोल्हापूरचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमान योगी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम रेडेकर यांचा व योगीराज पतसंस्थेचे दिशादर्शक चार्टर्ड अकाऊंटंट रोहित कासट यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की यापूर्वी संस्थेने भंडारा डोंगरावर उभ्या राहणाऱ्या तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी 10 लाख रुपये देणगी दिलेली आहे व लोकवर्गणीतून 1 कोटी रुपये देणगी दिली आहे. संस्थेने केलेल्या सर्व सामाजिक कामाचा लेखाजोखा व आर्थिक प्रगती चा आढावा यावेळी सांगितला.

याप्रसंगी रविकांत वरपे, ह.भ.प.संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, श्रीकांत पाटील, अनिल बालवडकर, संग्राम मुरकुटे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, संचालिका रंजना कोलते, अलका सिरसगे, सहयोगी संचालिका निकिता माताडे, माजी संचालक वसंत माळी, अशोक रानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे व इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.

See also  बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशन राष्ट्रीय कार्यकारणीवर निवड