शपुणे : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांवरील स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता ही प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली असून, क्षेत्रीय कार्यालयांवर स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय कार्यकर्त्यांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
क्षेत्रीय कार्यालयांवरील स्वीकृत सदस्य पदांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्राप्त अर्जांची छाननीदेखील करण्यात आली आहे. मात्र, छाननी पूर्ण होऊनही अद्याप स्वीकृत सदस्यांची अंतिम निवड जाहीर करण्यात आलेली नाही.
विधान परिषद निवडणुकांमुळे रखडलेली ही प्रक्रिया आता कधी पूर्ण होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणत्या व्यक्तींना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार, तसेच निवडीचे निकष काय असणार, याबाबतही चर्चा सुरू आहे.
अर्ज प्रक्रिया आणि छाननी पूर्ण झाल्याने आता अंतिम निवडीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित पदाधिकाऱ्यांकडून निवडीची घोषणा कधी केली जाते, याकडे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
















