कोथरूडच्या विघ्नेश केतन बंडगरने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण केले

कोथरुड: कोथरूड येथील तोरणा सोसायटी मधील विघ्नेश केतन बंडगर वय:9 वर्षे याने शिवगंगा रोलर स्केटर बेळगाव कर्नाटक येथे आयोजित केलेले गिनिज वल्ड रेकाॅर्ड त्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. तो इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे.


या रेकाॅर्डसाठी संपूर्ण भारतातून 370 विद्यार्थी यांनी स्केटिंग केले व जागतिक विक्रम नोंदवला.गिनिज वल्डबूक मध्ये याची नोंद झाली आहे.करोना काळ वगळता विघ्नेश गेली पाच वर्षे स्केटिंग करत आहे. त्याने विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंचवीस मेडल मिळवले आहेत.

See also  एमपीएलमध्ये महिलांचे प्रदर्शनीय सामने २५ जुन पासून