पुणे : अस्वच्छता पसरविल्या बद्दल सॅलीसबरी पार्क येथील गोल्डन बेकरी आणि इंडियन बेकरी या बेकऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे .
बेकरी व्यावसायिकांनी सांडपाणी अनधिकृतपणे सार्वजनिक नाल्यामध्ये सोडल्याचे आढळून आले . याबद्दल प्रत्येक बेकरी व्यावसायिकां कडून प्रत्येकी २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला . घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, उपायुक्त माधव जगताप यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक अमोल लांडगे , तौसिफ देशपांडे, चंद्रवदन गायकवाड यांनी कारवाई केली .














