दिल्लीच्या जंतर-मंतरनंतर पुण्यातही वातावरण तापले; पाषाणमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात बॅनरबाजी

पुणे, प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत असून, आता पुण्यातही राजकीय वातावरण तापू लागले आहे. पुण्यातील पाषाण परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करणारे बॅनर्स झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.

पाषाण परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर “Modi Go Back” तसेच “Modi = Murderer of Democracy in India” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या बॅनर्समुळे परिसरात राजकीय चर्चा रंगल्या असून, नागरिकांचेही याकडे लक्ष वेधले जात आहे.

ही बॅनरबाजी पाषाण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, त्यानंतर झालेल्या घटनांबाबत देशभरात विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील ही बॅनरबाजीही महत्त्वाची मानली जात असून, विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागल्याचे चित्र दिसत आहे.

See also  छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शंभूराजे क्रिकेट क्लब विजेता