पुणे मनपा सामाजिक विकास विभागाकडील मानधन तत्त्वावरील सेवकांना पालिका सेवेत सामावून घेण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद -माजी आमदार मेधा कुलकर्णी

पुणे : पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील पदनिर्मितीबाबत व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या सेवकांना महानगरपालिका सेवेत सामावून घेणेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राला सकारात्मक प्रतिसाद आणि तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश. पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत गेली अनेक वर्ष उलट सुलट पत्रव्यवहार चालू आहेत. समाज विकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग सर्व विभाग सकारात्मक असताना व नगर विकास विभागाच्या सर्व प्रश्र्नांना समर्पक उत्तरे मिळालेली असतानाही हा विषय मार्गी लागत नाही यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.

यावेळी सुनिता मोरे , शितल साळुंखे, सागर काशिद , राहुल म्हस्के हे उपस्थित होते

नवी मुंबई मनपा (समाजविकास विभाग), संभाजीनगर मनपा(समुहसंघटिका पद), परभणी मनपा स्थापत्य विभाग पिंपरी-चिंचवड मनपा (RCH), नांदेड मनपा (उपभियंता स्थापत्य),कल्याण डोंबिवली मनपा (वाहनचालक), मीरा भाईदर मनपा विधी विभाग लातूर मनपा (ANM) इ.ठिकाणी ठोक मानधनावर असलेल्या सेवकांना मनपा सेवेत कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले.
पुणे मनपा मध्येदेखील आरोग्य विभागाकडील (RCH) च्या 75 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. असे असताना समाज विकास विभागाकडील या सर्व कर्मचाऱ्यांना हा न्याय का देण्यात येत नाही याचे आश्चर्य वाटते. मनपा वरील आर्थिक बोजा या निर्णयाने फारसा वाढणार नसल्याचेही आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
या सर्वाचा सकारात्मकरित्या विचार करुन समाज विकास विभागाकडील मानधन तत्त्वावरील सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेऊन न्याय द्यावा अशी विनंती या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यावर त्यांनी त्वरित कार्यवाही करावी असा आदेश UD 2 विभागाला दिला आहे.

See also  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधांसाठी बार्टी, टीआरटीआय,महाज्योतीच्या प्रमाणेचसारथीकडूनही सवलती आणि सुविधा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील