पुणे, दि. २९ : पुणे महानगरपालिकेच्या माननीय महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाला “रामदूत” असे नाव देण्याचा प्रस्ताव नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे.
२८ जुलै २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार, प्रभाग क्रमांक १२ मधील घोले रोड येथे असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महापौरांच्या अधिकृत निवासस्थानास “रामदूत” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रस्तावाचे सूचक म्हणून नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी स्वाक्षरी केली असून, या प्रस्तावाला नगरसेविका अपूर्वा खेडेकर, ममता महेत्रे, पूजा जाधव, आनंदिता गंगोरे, सुनील माने-पाटील आणि सौ. पल्लवी जावळे यांनी अनुमोदन दिले आहे.
महापालिका प्रशासनाकडून या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. प्रस्तावाला स्थायी समिती किंवा महापालिकेच्या संबंधित प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतरच नाव बदलाबाबत अंतिम निर्णय होईल.
















