बाणेरमध्ये दलित कुटुंबाचे घर जमीनदोस्त, 15 जणांवर ॲट्रॉसिटी सह गंभीर गुन्हे दाखल

पुणे (बाणेर) – बाणेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, लिंक रोड, नॅनोस्पेस आयटी पार्क शेजारील स.नं. 5/1ब येथे राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या कुटुंबाचे घर बेकायदेशीरपणे पाडून साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

FIR No. 0260/2026, दि. 13/08/2026 रोजी 23:25 वा. दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्री. संतोष जगदिश लोंढे (वय 38, जात – मांग गारुडी), रा. वरील पत्ता. फिर्यादी हे म्हाळुंगे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीस आहेत. पत्नी पुजा, वडील जगदिश, आई ममता आणि मुले पवन, हर्षदा यांच्यासह ते सदर ठिकाणी राहतात.

फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या जागेवरून बिल्डर कैलास वाणी, कैवल्य वाणी यांच्याशी वाद असून दिवाणी दावा क्र. आरसीएस/729/2026 पुणे महानगरपालिका सिव्हील कोर्टात आणि महसूल कोर्टात दावा क्र. आरटीएस/ई/एसआर/223/2026 प्रलंबित आहे. यापूर्वी जमिनीच्या वादातून परस्परविरोधी तक्रारीही दाखल आहेत.
दि. 13/08/2026 रोजी सकाळी फिर्यादी संतोष लोंढे आणि त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी 04/00 वाजण्याच्या सुमारास फोनद्वारे त्यांना माहिती मिळाली की त्यांचे चुलते दशरथ लोंढे यांचे घर पाडण्यात येत आहे. घरी जाऊन पाहणी केली असता नॅनोस्पेस कंपनीच्या आतमध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन बाऊंसरने गेट कंपाऊंड बंद केले होते. आतमध्ये प्रवेश न दिल्याने फिर्यादींनी आरडाओरडा केला असता 10 ते 15 लोक पळून गेले. त्यामध्ये राहुल वाघवले आणि काही अनोळखी इसम होते.

त्यानंतर घराकडे गेल्यावर दिसले की, चुलत्यांचे घर जवळपास पाडण्यात आले होते. तर फिर्यादींचे संडास बाथरूम तोडले, पाईपलाईन तोडली, ड्रम, पाण्याच्या बादल्या, पाणी पिण्याचे हंडे, टीव्ही, लाईट मीटर आणि लॅपटॉपचे नुकसान केले. घरातील सर्व गोधड्या, चादरी इत्यादी सामान खड्ड्यात फेकून दिले होते. फिर्यादींचे म्हणणे आहे की, मी अनुसूचित जाती जमाती वर्गामधील मांग गारुडी या जातीचा सदस्य असल्याचे माहिती असतानाही बेकायदेशीरपणे घराचा ताबा घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले असून हे कृत्य बिल्डर कैलास वाणी यांच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय आहे.

See also  स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

गुन्हा दाखल –
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात इसम नामे राहुल वाघवले आणि इतर 10 ते 15 अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 333, 324(4), 126(2), 329(3), 189(2), 189(6), 190, 3(5) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 चे कलम 3(1)(f), 3(1)(g), 3(2)(va) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर विठ्ठल सावंत (DGPCVSM7801) हे करीत आहेत. जबाब सहा पोलीस निरीक्षक अनिल केकाण, बाणेर पोलीस स्टेशन यांनी नोंदवला आहे.