पुणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
पक्षांतर्गत होत असलेली कुरघोडी चे राजकारण तसेच महाविकास आघाडीचा धर्म म्हणून सध्या स्थानिक पातळीवर होत असलेली घुसमट आधी पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेले दहा वर्षापासून बाळासाहेब चांदेरे शिवसेनेचे सक्रिय काम करत आहे. मुळशी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे तसेच काँग्रेस पक्षामध्ये असताना युवक जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी संघटनात्मक बांधणी केली होती.
बाळासाहेब चांदेरे यांचा शिवसेनेमध्ये (मुख्यमंत्री शिंदे गट) प्रवेश होत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले,सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्षातील स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा प्रोटोकॉल सोडून काही पदाधिकारी कुरघोडीचे राजकारण करत असल्याने मला अतिव दुःख झालेले आहे. मी मूळ काँग्रेस पक्षाचा युवक जिल्हाध्यक्ष, मुळशी पंचायत समिती सभापती म्हणून काम करत होतो.2014 ला भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून पक्ष प्रवेश देण्यात आला. 2019 ला सुद्धा पक्षाने दुसऱ्यांदा अपेक्षा भंग केला. तदनंतर मला शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आणि इनाम इतबारे पक्षाचे काम पुन्हा जोमाने करण्यास सुरुवात केली मी आपल्या शिवसेना परिवारामध्ये आल्यानंतर पक्षाच्या सर्व पदांना न्याय देण्यासाठी काम केलं परंतु महाविकास आघाडीचा धर्म म्हणून सध्या स्थानिक पातळीवर घुसमट होत असलेल्या कुटनिती राजकारणामुळे मी माझी राजकीय कारकीर्द खंडित होऊ नये म्हणून मी एक कठोर निर्णय घेत आहे. तमाम शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे तसेच पक्षातील सर्व नेते वरिष्ठ पदाधिकारी यांचा मी शतशः ऋणी आहे.