पौड : गेल्या सात दिवसापासून पेटलेल्या मुळशी धरणग्रस्तांच्या आंदोलनाला अखेरी यश उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे थेट संवाद पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे यांनी पुकारलेल्या अमर उपोषण आणि इतर सर्व आंदोलने आज मागे घेण्यात आली आहे. यासाठी माजी आमदार संग्राम दादा थोपटे यांनी मध्यस्थी केली.
उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी फोनवरून कंधारे यांची चर्चा करून विविध अनेक मागण्यांना सकारात्मक तोडगा काढण्याचे आठ दिवसात आश्वासन दिले या आश्वासानंतर यांनी फळांचा रस घेऊन उपोषण सोडले. यावेळी मुळशी तालुक्यातील नागरिकांनी आश्वासन दिले याची पूर्तता झाली पाहिजे अशी मागणी केली.
उपोषण मागे घेतल्यानंतर अमित कंधारे यांनी मंत्री महोदयांचा शब्द दिलेला शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आता शासनाने दिलेला आश्वासन अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे. अन्यथा अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आठ दिवसात रस्त्यावर उतरू त्रिव प्रकारचे आंदोलन उभे राहील व बेमुदत उपोषण हे चालूच राहील त्यावेळी अमित कंधारे म्हणले आहेत.
















