‘युवा शक्ती जागृत झाली की राष्ट्रशक्ती बळकट होते’; पुण्यात हजारो युवकांचा संपूर्ण वंदे मातरम् गायनात सहभाग

पुणे, दि. २२ : भारतातील युवा काँग्रेसला संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. भाजपाच्या वतीने आणि ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’ यांच्या आयोजनातून #YuvaKiAwaz या उपक्रमांतर्गत संपूर्ण वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

संपूर्ण वंदे मातरम् गायनाच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि मातृभूमीप्रती असलेली निष्ठा यांचा जागर करण्यात आला. युवा शक्ती जागृत झाली की राष्ट्रशक्ती अधिक बळकट होते. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांचा सहभाग आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, “भारतातील युवा काँग्रेसला संपूर्ण वंदे मातरम् गायला लावल्याशिवाय राहणार नाही,” असे सांगितले.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कृष्णकांत महाडिक, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने देशभक्त पुणेकर युवक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान हजारो युवक-युवतींनी एकत्रितपणे संपूर्ण वंदे मातरम्‌चे गायन करून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. त्यामुळे पुण्यातील युवा शक्तीने देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जागर केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

See also  पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमेश्वरवाडी ग्रामस्थांचा सचिन दळवी यांना बैठक घेत एकमुखी पाठिंबा