कोथरूड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मतदारसंघातील शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी मेळावा घेण्यात आला.
तसेच नाव नोंदणी अभियानांतर्गत कोथरूड मतदारसंघातील या परिसरांमध्ये ज्या महिलांनी सदरील योजनेंतर्गत नावनोंदणी केली आहे, त्या सर्व महिलांना अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने आशिष गार्डन, कोथरूड येथे आकर्षक साडी भेट म्हणून देण्यात आली. माता भगिनींना साड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक श्री. किरण दगडे पाटील , अमोल बालवडकर फाउंडेशन चे सभासद व इतर मान्यवर आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.
घर ताज्या बातम्या कोथरूड मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने अडीच...