अखिल सुसगाव दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुसगाव, मुळशी : अखिल सुसगाव दहीहंडी उत्सवाला यंदा सुसगाव व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. गोविंदांचा उत्साह आणि नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय तसेच उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला.

या दिमाखदार दहीहंडी सोहळ्यास विधान परिषदेचे उपसभापती सचिनभाऊ आहेर तसेच मराठी सिनेसृष्टीतील मान्यवर कलाकारांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मुळशी तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय व संघटनांचे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांची एकजूट, सामाजिक सलोखा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग प्रकर्षाने दिसून आला. पारंपरिक उत्साहासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सुसगावकरांनी या सोहळ्याला मोठे स्वरूप दिले.

“नागरिकांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि अभूतपूर्व प्रतिसाद हीच पुढील सामाजिक कार्याची प्रेरणाशक्ती आहे,” अशी भावना शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख तथा मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी व्यक्त केली.

See also  प्रजासत्ताक दिनी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे ध्वजवंदन