बाणेर : माजी नगरसेवक स्व.शिवाजीराव बांगर साहेब यांच्या जयंतीनिमित्त छत्र्यांचे प्रभागातील नागरिकांना माजी नगरसेवक दत्ता बहिरट पाटील,पुणे शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहल बांगर-तलाठी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण, मनोज दळवी, नाना भाऊ वाळके, पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, कोथरूड ब्लॉकचे दत्ता जाधव, पुणे शहर युवक इंटकचे अध्यक्ष योगेश नायडू, महिला काँग्रेसच्या सुंदर ओव्हाळ, लता घडसिंग व प्रमुख पदाधिकारी इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक स्वर्गीय शिवाजीराव बांगर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते ओम बांगर यांनी केले.























