खासदार तुपे पाटील स्मार्ट ई लर्निंग स्कूलमध्ये उत्साहात ‘पुस्तक दहीहंडी’ साजरी

हडपसर | प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त डी. पी. रोड, माळवाडी येथील स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूलमध्ये पारंपरिक दहीहंडीला शैक्षणिक स्वरूप देत ‘पुस्तक दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी मैत्री वाढावी तसेच ज्ञानाची गोडी लागावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक हे ज्ञानाचे भांडार असून नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांची ज्ञानक्षमता, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि शब्दसंपदा समृद्ध होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक विनायक पुणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “दररोज काही वेळ पुस्तक वाचनासाठी द्यावा. वाचनाची सवय ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची असून वाचनाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे,” असे आवाहन केले.

या उपक्रमाला अस्मिता मॅडम, सारिका मॅडम, वंदना मॅडम, अश्विनी मॅडम, शुभांगी मॅडम, नांदगुडे मॅडम, विद्या मॅडम, उमा मॅडम, शर्मिला मॅडम, पाटील सर, सुनील सर, अमोल सर, गणेश सर, जाधव मावशी, जगताप मावशी, चव्हाण मावशी, मयुरी दीदी, अदिती दीदी, वैभवी दीदी, कृष्णा भैया, ऋतुराज भैया, बडदे मामा आणि किरण मामा यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक अक्षयकुमार कांबळे सर, सलमा शेख मॅडम आणि कृष्णाली काटमोरे मॅडम यांनी केले.

पारंपरिक दहीहंडीच्या माध्यमातून आनंद आणि उत्साह साजरा करताना त्याला वाचन, ज्ञान आणि संस्कारांची जोड देणारी ‘पुस्तक दहीहंडी’ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून देतानाच पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश देण्यात आला.

See also  राजकारणात महिलांना सक्षम करण्यासाठी  'इंदिरा फेलोशिप' : ससाने