भाजपाचे माजी शहरचिटणीस सुनील माने यांनी दिला पक्षाचा राजीनामा

औंध : डीजे व लेझर विरोधी आक्रमक भूमिका घेणारे भाजपाचे माजी शहर चिटणीस सुनील माने यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा राजीनामा देत समाजाच्या प्रश्नांसोबत सदैव राहणार असल्याचे सांगितले.

सण समारंभ, जयंती यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या डीजे व लेझर मुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या विरोधात भाजपाचे सुनील माने यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता. काही दिवसापूर्वी त्यांना आलेल्या धमक्यांच्या विरोधात देखील त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

शिवाजीनगर मतदार संघातील एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांची भाजपा मध्ये ओळख आहे. तसेच खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची ओळख होती. नागरिकांच्या प्रश्नसंदर्भामध्ये पक्षाकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळत नसल्याने पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. औंध बोपोडी परिसरातील विविध सामाजिक कार्यामध्ये असलेला त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सुनील माने यांच्या राजीनामामुळे शिवाजीनगर मतदार संघासह बोपोडी परिसरातील स्थानिक राजकारणावर देखील या राजीनामामुळे प्रभाव पडणार आहे.

See also  कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा एकनाथ शिंदेंचा पहिलाच पक्ष – खा. सुप्रियाताई सुळे