योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 27 सप्टेंबरला ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार

बाणेर : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार प्राप्त योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बाणेर या “संपत्ती, संस्कृती संवर्धनारी संस्था” ची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी ही माहिती दिली. ही सभा रविवार, दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता माऊली गार्डन मंगल कार्यालय, बाणेर रोड, बाणेर, पुणे येथे होणार आहे. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेश शं. विधाते, शाखाध्यक्ष श्री. राजेंद्र मुरकुटे, शाखाध्यक्ष श्री. शंकरराव सायकर यांनी सर्व सभासद व ठेवीदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

See also  लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी सज्ज आरोग्य यंत्रणा१९२ वैद्यकीय पथके, १७६ रुग्णवाहिका, ४,५०० औषध किट