खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते यांचा भाजप प्रवेश
विश्वासघात करून एबी फॉर्म देण्याचे टाळल्याने निर्णय

खडकवासलाः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक खडकवासला गावचे माजी लोकनियुक्त सरपंच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचा कार्यकर्ता  युवा अध्यक्ष सौरभ मते यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी शिवणे, खडकवासला, धायरी पार्ट या प्रभाग क्रमांक 33 मधून ते  इच्छुक होते. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसला खडकवासला मतदारसंघात खिंडार पडल्याची मानले जात असून पक्षाची ताकद कमकुवत झाली आहे.

सामाजिक कामाचा गतिमान आवाका असलेले  व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांना तिकीट मिळणार अशी या प्रभागातील जाणकार ठसून सांगत होते, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत  त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांचा फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्ष मधून वैध ठरवला. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात करून एबी फॉर्म देण्याची टाळण्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील चारही जागांवर अपक्षांचे पॅनल करून लढण्याचा त्यांनी निर्धार केला होता परंतु निर्णायक वळण मिळाले नाही. पक्षाचा सूचक इशारा समजत त्यांनी या निवडणुकी मधून माघार घेतली.

त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आणि पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या इच्छुक उमेदवारांना सौरभ मते यांची कारकीर्द संपुष्टात आली असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते परंतु  माजी सरपंच कै. महेशभाऊ मते यांचा वारसदार आणि राजकीय आणि सामाजिक काम नसानसात भिनलेल्या आणि तरुण वर्गासह मध्यमवर्गीय कामगार आणि सर्व स्तरातून तरुणांच्या मोठा पाठिंबा असल्याने त्यांनी  विणलेल्या  सामाजिक कामांची बांधणी घट्ट असल्याने  वारस्याची जपणूक करून चालवण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टी जाण्याचा निर्णय घेतला.

See also  प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी माजी आमदार नितीन भोसले