औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2026 अभियानाच्या अंतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ श्रमदान अभियान

औंध : पुणे महानगरपालिकेच्या वतीने “स्वच्छता ही सेवा 2026” अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा एक भाग म्हणून औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एक दिवस, एक तास,एक साथ श्रमदान अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत मेडिपॉइंट हॉस्पिटल चौक ते आंबेडकर चौक औंध ते परिहार चौक* या परिसरात श्रमदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानामध्ये  उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका संतोष वारुळे साहेब माननीय महापालिका सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट साहेब तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे व सर्व आरोग्य निरीक्षक मुकादम व सफाई सेवक त्याचप्रमाणे स्वच्छ सेवा संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध या संस्थेचे विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

See also  आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘पंजाब दौऱ्याचे’ विमान तिकीट भेट