हा विजय सर्वांचा आहे या बद्दल मी सर्वांच्या ऋणात सदैव राहीन- डॉ. निवेदिता एकबोटे

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये छत्रपती शिवाजीनगर विभागात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह आणि मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) शिवाजीनगरच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार कारणासाठी विजयोत्सव या कार्यक्रमाचे अयोजन  प्रोग्रेसव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. प्रियांका भट यांच्या ईशास्तवानाने झाली. यानंतर पी ई सोसायटीचे सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,” ध्येय आणि विकास पुढे ठेऊन मिळालेला हा विजय आहे. आज युवकांचे राजकारण आहे आणि पुढील पाच वर्षात असे काम करा, त्यामुळेच पुढील विजय मिळेल. त्यांच्याच हस्ते पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. निवेदिता एकबोटे यांचा सत्कार झाला.

डॉ. निवेदिता एकबोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेला हा विजय आहे. मला सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे. पुढील काळात 12 वॉर्ड मधील सगळ्या समस्यांचा विचार करून त्या सोडविण्यासाठी मी जास्त प्रयत्न करेन.हा विजय आपला आहे या बद्दल मी सर्वांची ऋणी आहे.

पी. ई. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष डॉ. अरविंद पांडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, पी. ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाची सांगता प्रा. स्वाती पटवर्धन यांनी पसायदानाने केले.या सूत्रसंचालन डॉ. वैजयंती जाधव यांनी केले तर पी. ई. सोसायटी कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी आभार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमासाठी सहकार्यवाहक प्रा. सुरेश तोडकर उपकार्यवाहक चित्तरंजन कांबळे, प्रा. डॉ. प्रकाश दीक्षित, दीपक मराठे आणि मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

See also  बाणेर येथील मुळा नदी सुधार प्रकल्पाने बाधित होत असलेल्या सोंडमळा देवराई ची संयुक्त पाहणी पुणे मनपा,वन विभाग  व जायका प्रकल्प अधिकारी यांनी केली