औंध येथील दुकानांमध्ये चोरी; व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना वाळके यांची घटनास्थळी पाहणी

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू आणि गजबजलेल्या औंध परिसरातील नामांकित ‘जोशी स्वीट्स’ (Joshi Sweets, Aundh) येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीच्या घटनेत दुकानातील सुमारे ₹३५,००० रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे औंध परिसरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच औंध व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना वाळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी पीडित व्यापाऱ्याची भेट घेऊन धीर दिला, तसेच पोलिसांशी संपर्क साधून चोरीच्या तपासाबाबत चर्चा केली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करण्याची आणि औंध परिसरातील रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नाना वाळके यांनी केली आहे. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावरील नामांकित दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

See also  सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये सरस्वती पूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न