दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऐश्वर्या बाबर यांच्याकडून एक लाखांची देणगी

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने ऐश्वर्या बाबर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐश्वर्या बाबर यांचे आभार मानले. या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे उपस्थित होते.

दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ऐश्वर्या बाबर यांनी दिलेल्या या आर्थिक योगदानाची यावेळी नोंद घेण्यात आली.

See also  सर्वच राजकीय पक्षांबद्दल युवकांत नैराश्य -अभिजित दीपके