पुणे : सध्याच्या राजकीय वातावरणात सर्वच पक्षांबद्दल युवकांमध्ये नैराश्य आल्याने हा युवक कॉक्रोच जनता पार्टीकडे वळतो आहे , असा दावा पार्टीचे संस्थापक युवानेते अभिजित दीपके यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे प्रसार माध्यमांशी दीपके यांनी आज रविवारी बातचीत केली . नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन स्थळी युवकांची गर्दी होती , उत्स्फूर्तपणे स्वखर्चाने युवक युवती तिथे आले होते, असेही दीपके यांनी सांगितले.
नीट परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द कराव्या लागल्या या प्रकाराची जवाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यायला हवी । याकरिता त्यांचा मंत्री पदाचा राजीनामा आम्ही मागितला आहे, असे दीपके यांनी स्पष्ट केले.
सीबीएसई परिक्षेतील घोटाळा सतरा वर्षाच्या वेदांतने उघड केला त्याला पाकिस्तानी ठरविले , मलाही पाकिस्तानी ठरवितात . सत्ताधाऱ्यां विरोधात कोणी बोलले की त्याला लगेच पाकिस्तानी ठरविले जाते . मग अशा म्हणण्याने भारतीय कोणी आहे की नाही? का फक्त भाजपवाले भारतीय आहेत , असा सवाल दीपके यांनी केला . भाजपने देशात चांगली कामे करावीत मग कोण त्या विरुद्ध बोलेल असेही दीपके म्हणाले .
देशातील परिक्षा, पेपर फुटी बद्दल बोललो यात चुकीचे काय केले, असे उत्तर दीपके यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर बोलताना दिले .















