पिरंगुट : अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथील प्रा. बी. आर. घोडके यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्याबद्दल ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित पहिल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय साहित्य संमेलनात हा सन्मान करण्यात आला.
ड्रीम फाऊंडेशन, सेवा फाऊंडेशन आणि डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात प्रा. घोडके यांना निमंत्रित कवी म्हणूनही आमंत्रित करण्यात आले होते. खासदार बसवराज पाटील शेडम, डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा संमेलनाचे संयोजक काशिनाथ भतगुणकी आणि सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रा. घोडके यांनी पुण्यातील साहित्यिकांच्या घरोघरी जाऊन सुमारे १,७५० पुस्तके संकलित केली. या पुस्तकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समृद्ध ग्रंथालय उभारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी मदत केली आहे.
प्रा. घोडके यांनी पुण्यातील साहित्यिकांच्या घरोघरी जाऊन सुमारे १,७५० पुस्तके संकलित केली. या पुस्तकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समृद्ध ग्रंथालय उभारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी मदत केली आहे.पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, लोकसहभागातून हजारो झाडांचे वृक्षारोपण केले आहे. सध्या ते ग्रामीण भागातील जलसंधारणाच्या कामातही सक्रिय योगदान देत आहेत. कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना शिधावाटप करून मदतीचा हात दिला होता. याशिवाय विद्यार्थी चळवळ आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, लोकसहभागातून हजारो झाडांचे वृक्षारोपण केले आहे. सध्या ते ग्रामीण भागातील जलसंधारणाच्या कामातही सक्रिय योगदान देत आहेत. कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना शिधावाटप करून मदतीचा हात दिला होता. याशिवाय विद्यार्थी चळवळ आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.या सर्व कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सर्व कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
















