पुणे : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पर्वती,पुणे व धनकवडी सहकारनगर कार्यालय पुणे महापालिकेच्या संयुक्त सहभागातून ‘श्रमसंस्कार स्वच्छतेतून समृद्धीकडे’ या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती सुरेखा भणगे, सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका, मा.प्रमिला गायकवाड, सरचिटणीस, आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, संयुक्त चिटणीस अजय पाटील, खजिनदार धैर्यशील वंडेकर, संस्थेचे पदाधिकारी किशोर बाबर, श्रीराम गायकवाड, विजय शितोळे यांचे उपस्थित होते.
प्रमिला गायकवाड यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रमदानातून स्वच्छतेकडे हा एक सामाजिक उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले सामाजिक दायित्व आणि नागरी जबाबदारीची जाणीव करून देणे हा उद्देश आहे. दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यातून होणारी समृद्धी याची जाणीव या उपक्रमातून विद्यार्थ्यांना होईल. आज मोबाईल च्या आहारी गेलेल्या तरुणाईला या श्रमसंस्कारामुळे वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यदायी सवयी आणि पर्यावरणाची काळजी घेऊन समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या सवयी रुजण्यास मदत होऊन श्रमाचे महत्व, सामुहिक सहभाग, स्वच्छतेच्या सवयी,शारीरिक व मानसिक सुदृढता,निरोगी वातावरण, संघभावना, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्व विकास यासारखे संस्कार रुजण्यासा मदत होईल अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली. मा. धैर्यशील वंडेकर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना सस्वअनुवातून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. श्रीमती सुरेखा भणगे यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नाचा उल्लेख करून स्वच्छता हि आपली समाजीक जबाबदारी असून त्यातून मुक्त होण्यासाठी स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये रुजविला पाहिजे असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेच्या सर्व शाखांच्या साधारणपणे 200 विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी पुणे महापालिका कडून सहा. आयुक्त सुरेखा भणगे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नाईक, प्रमिला गायकवाड, अजय पाटील,धैर्यशील वंडेकर, किशोर बाबर, श्रीराम गायकवाड, विजय शितोळे, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि 200 विद्यार्थ्यानी उस्फूर्तपणे या श्रमदानातून स्वच्छतेकडे या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.आकाश दोडके आणि पुणे महापालिका कडून श्री संतोष भाईक वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी काम पहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दीपक गायकवाड यांनी केले तर आभार डॉ.अर्चना मोरे यांनी मानले.