HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे पुणे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे निर्देश

पुणे : पुणे शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अनुषंगाने HCMTR (High Capacity Mass Transit Route) तसेच इनर रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम व मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी घेतला.

HCMTR अंतर्गत आवश्यक असलेल्या खासगी जागांच्या भूसंपादनाची सद्यस्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित जागांची मोजणी प्राधान्याने व लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच, भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

यावेळी इनर रिंग रोड प्रकल्पाच्या अनुषंगाने संयुक्त मोजणीची सद्यस्थिती तसेच भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संयुक्त मोजणीची प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करून भूसंपादनाची पुढील प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त(जनरल) श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, मा. उपायुक्त निखिल मोरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  प्रितम उपलप यांना पीएच. डी.