विशेष प्रतिनिधी : शिवसेनेच्या (उबाठा) फुटीनंतर महाराष्ट्रात भाजपच्या विरोधातील पक्ष म्हणून उरली फक्त काँग्रेसच.
महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरे गटाचे २०, काँग्रेसचे १५, शरद पवार गटाचे ८ आमदार आहेत. यापैकी शिवसेना (उबाठा) चे १६ आमदार कोणत्याही क्षणी पक्षातून बाहेर पडतील, अशी चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार त्यांच्यापासून फुटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले. दिल्लीच्या वर्तुळात शिवसेना कमकुवत झाली. महाराष्ट्रात फूट झाल्यास राज्यातही शिवसेना दुर्बळ होईल.
राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका यामध्ये ठाकरे गटाचे अस्तित्व नगण्य आहे. दिल्लीतही शिवसेना दुबळी झाली आहे. हीच अवस्था नजीकच्या काळात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजपच्या विरोधात काँग्रेस पक्ष हा एकमेव राष्ट्रीय पक्ष उरतो. काँग्रेसला पाठिंबा वाढत असल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत २०२९ मध्ये होईल. काँग्रेसचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती मजबूत आहे. सपकाळ भाजप विरोधात सक्षम पर्याय उभा करतील, अशी अपेक्षा आहे.
















