प्रितम उपलप यांना पीएच. डी.

पुणे : प्रितम सुशिल उपलप यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्याकडून पीएच. डी. पदवी जाहीर झाली. ‘इम्पॅक्ट ऑफ ऑर्गनायझेशनल कल्चर ऑन क्वालिटी मॅनेजमेंट इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री ऑफ पुणे रिजन’ या विषयावर संशोधन पूर्ण करून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रितम उपलप यांनी प्रबंध सादर केला होता.

पुणे विभागाच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील क्वालिटी मॅनेजमेंट घटकावर झालेल्या परिणामाचे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी विद्यापीठाला नुकतेच सादर केले होते. त्याबद्दल त्यांना विद्या वाचस्पती पदवी देण्यात आली. यासाठी त्यांना प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल उपलप कुटुंबीय आणि मित्र परिवाराने अभिनंदन केले.

See also  बोरघर येथे 'सेंद्रिय शेती' कार्यशाळेस आदिवासी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद