पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत लहान मुलांसाठी हृदयावरील मोफत शस्त्रक्रिया अभियान दिनांक १४ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल (कोरेगाव पार्क), लोकमान्य हॉस्पिटल (सेनापती बापट रोड) यांच्या सहकार्याने विशेष अभियान राबविण्यात येईल. या अभियानात मोफत सुविधा घेण्यासंदर्भात हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी रुग्णाने दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयातून (२५०, बुधवार पेठ, बेलबाग चौकाजवळ) ट्रस्टचे पत्र घेणे आवश्यक आहे. तसेच रेशन कार्ड/आधार कार्ड/उत्पन्न दाखल्याची प्रत ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी सहा दरम्यान संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ०२०२४४७९२२२/२४४३०५२७
या अभियानाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरूण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख श्री डॉ राजेंद्र परदेशी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत .
















