पुणे ग्रँड टूर २०२७ स्पर्धेच्या अनुषंगाने पॅकेज वन अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची आयुक्तांकडून पाहणी

पुणे : पुणे ग्रँड टूर २०२७ स्पर्धेच्या अनुषंगाने पॅकेज वन अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांची पाहणी मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज केली. यावेळी बाणेर रस्ता (यशदा ते गणराज चौक) तसेच खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

पाहणीदरम्यान सुरू असलेली डांबरीकरणाची कामे, चेंबरची उंची रस्त्याच्या पातळीनुसार समायोजित करणे, फुटपाथची कामे तसेच इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कामांचा वेग वाढवून फुटपाथसह सर्व संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मा. आयुक्त यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच मेट्रोच्या पिलरचे सुशोभीकरण करण्यासाठी त्यांना रंगरंगोटी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मेट्रो मार्गाखालील रस्त्यावरील दुभाजक एकाच सरळ रेषेत आणून रस्त्याचे स्वरूप अधिक सुटसुटीत व सुव्यवस्थित करण्याबाबतही आयुक्तांनी निर्देश दिले.

यावेळी ब्रेमेन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खडकी रेल्वे स्टेशन ते एबीआयएल चौक तसेच गणेशखिंड रस्ता या मार्गांदरम्यान सुरू असलेल्या डांबरीकरण, फुटपाथ निर्मिती व अन्य रस्ते विकासकामांची पाहणी करण्यात आली.

यावेळी मा. महापालिका अतिरिक्त आयुक्त (वि.) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ विभाग) राजेश बनकर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) तुषार बाबर, उपायुक्त अविनाश सपकाळ, पथ विभागातील अन्य अधिकारी, तसेच पीएमआरडीए, मेट्रो, PITCMRL, MSEDCL आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय कामाचे ठेकेदार मे. गणेश कन्स्ट्रक्शन आणि तज्ज्ञ सल्लागार पेवटेक कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

See also  अजितदादा पवार हे 65 वर्षाचे सीनियर सिटीजन आहेत - खासदार सुप्रिया सुळे