सुतारवाडी ग्रामस्थ आणि मयूर सुतार यांच्या आंदोलनानंतर पाषाण तलाव येथील RMC प्लांट बंद करण्याची कारवाई सुरू

सुतारवाडी : सुतारवाडी पक्षी अभयारण्यालगत अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या RMC (Ready-Mix Concrete) प्लांट विरोधात सुतारवाडी ग्रामस्थ आणि श्री. मयूर सुतार [ मनसे  शाखा अध्यक्ष सुतारवाडी ] यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
पाषाण तलाव पक्षी अभयारण्याच्या संवेदनशील परिसरात सुरू असलेल्या या प्लांटमुळे तसेच कामगार वसाहतीमुळे होणारे ध्वनी, वायू, जल आणि धूळ प्रदूषण यामुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाला गंभीर धोका निर्माण झाला आहे, अशी नागरिकांची भावना आंदोलनादरम्यान नागरिकांनी व्यक्त केली.


परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
पांडुरंग सुतार [ उपविभाग अध्यक्ष मनसे  ]  अनिकेत मुरकुटे, [ उपविभाग अध्यक्ष मनसे ]  शिवम दळवी [ शाखा अध्यक्ष सोमेश्वरवाडी ] नारायण सुतार  महेंद्र रणपिसे (मनसे पदाधिकारी), नरेंद्र वाणी, नासिर शेख, विजय धाकाने, श्रीकांत देशपांडे, उमेश साळुंखे, महेश सुतार [ शिवदूत ] अमोल फाले [ शाखा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे ], राहुल काकडे, शशिकांत खेडेकर, संतोष खेडेकर, हनुमंत खेडेकर, सुरेश खेडेकर, विजय सुतार, बाळासाहेब सुतार,  श्रीरंग सुतार, दशरथ खेडेकर, गणेश चव्हाण, समीर सुतार, नीलचंद्र माने ज्ञानेश्वर सुतार, संतोष चिंतामणी, कृष्ण सुर्वे, अंकुश क्षीरसागर, राकेश एरडोनी, सुहास कुलकर्णी, प्रसन्न आरोळे, वरद देव, अनिता खेडेकर, शशिकला भोसेकर, शंकुतला सुतार, मनीषा सुतार, उर्मिला सुतार अलका नाथ, ऍड. मनीषा करे आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान  NHAI चे  स्थानिक अधिकारी श्री. मोहन दुबे (व्यवस्थापक) आणि श्री. विक्रम पाटील (व्यवस्थापक)  यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी संबंधित प्लांट  बंद करण्याचे आश्वासन दिले. तसेच मशीनरी व यंत्रसामग्री हलवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू केली असल्याचे सांगितले. यांनतर लेबर कॅम्प व परिसराची नागरिकांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली .
कायदेशीर बाबी तपासून लेबर कॅम्प आणि जागा पर्यावरणाला हानी होणार नाही . अशी मागणी करण्यात आली . आंदोलनकर्त्यांकडून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले त्यावेळी पीएसआय सौ. अलका सरग मॅडम आणि एपीआय श्री. सानप उपस्थित होते .

यावेळी पुढील पाठपुरावा करण्यासाठी पाषाण तलाव पक्षी अभयारण्य बचाव कृती समिती सुतारवाडी तयार करण्यात आली. पाषाण तलाव परिसरात टाकण्यात येणारा राडारोडा, पाषाण तलाव लागत असलेला कचरा, तसेच पाषाण तलाव परिसरात होत असलेली अनधिकृत बांधकामे तसेच पक्षी अभयारण्य परिसरातील समस्यांच्या बाबत आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

See also  महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन