कोथरूड शिवसेनेतर्फे अनाथ मुलांसोबत बालदिन आणि खाऊ वाटप, खेळणी वाटप, वस्तू मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

कोथरूड : बाल दिनाचे अवचित साधून कोथरूड शिवसेनेच्या, युवा सेना वतीने उमेद संजीवन फाउंडेशन येथील अनाथ व निराधार मुला-मुलींसोबत बालदिन उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुलांना बाल दिनाच्या शुभेच्छा देऊन खेळणी वाटप, खाऊचे वाटप, गृह उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे आश्रमातील लहान मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद आणि स्मितहास्य फुलले. मुलांसोबत वेळ घालवत त्यांच्याबरोबर बाल दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे, युवा सेना, कार्यकर्ते , रमेश उभे, देवेंद्र सुतार, अन्निराज कुराडे, समर्थ सुपेकर, सौ मिनलताई  धनवटे  आश्रीयश वाल्हेकर,लक्ष्मीकांत गोणेकर,संतोष रिंगणे आदी उपस्थित होते. कुमारी स्वानंदी  रिंगणे हिने बाल दिनानिमित्त योगासन प्रात्यक्षिक करून दाखविले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन  किरण दादासाहेब मारणे, प्रणय पोपटलाल मेहता यांनी केले होते.

See also  इंधन दरवाढी विरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन