PICT पुणे मध्ये फुल स्टॅक वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटवर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन

पुणे : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कंप्युटर टेक्नोलॉजी (PICT) महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान केली आहे. कंप्युटर इंजिनीअरिंग विभागाने “फुल स्टॅक वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट: डिमिस्टिफाइड” या विषयावर 50 तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला आहे. हा कोर्स 20 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.

या कोर्सचे समन्वयक श्री. पराग जामभुलकर, पूजा कोहोक आणि रजनी जाधव आहेत.
हा कोर्स ऑनलाइन पद्धतीने दिला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि कार्यरत व्यावसायिकांना जागतिक स्तरावरच्या तंत्रज्ञानाशी जोडले जाईल. कोर्समध्ये वेब डेव्हलपमेंटच्या सर्व टॉपिक्स समाविष्ट असतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना समजून उमजून प्रॅक्टिकल ज्ञान मिळेल. विद्यार्थ्यांना 75% हजेरीसह प्रमाणपत्र दिले जाईल.
कोर्समध्ये वेब डेव्हलपमेंटच्या विविध टॉपिक्सवर सखोल ज्ञान दिले जाईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या फुल स्टॅक डेव्हलपमेंट कौशल्यांचे उत्तम सुसंस्कृत व महत्त्वपूर्ण क्षेत्रात प्रशिक्षण मिळेल. नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/FmkBuEbqdDJmoy869 उपलब्ध आहे.

हा कोर्स प्राचार्य संजय गंधे, संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, आणि विभागप्रमुख गीतांजली काळे, क्लाऊड कॉम्पुटिंग तज्ञ प्रा. प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जात आहे. या कोर्सला सर्व विद्यार्थ्यांना आणि कार्यरत व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

See also  खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल