पुणे महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काव्य स्पर्धा उत्साहात

पुणे :पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने आयोजित काव्य स्पर्धा आज पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. दरवर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गत सदर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या काव्य स्पर्धेत पुणे शहरातील तसेच शहराबाहेरील अनेक कवींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम क्रमांक संजय जाधव, द्वितीय क्रमांक सुजित कदम आणि तृतीय क्रमांक संतोष गाढवे यांनी पटकावला. विजेत्या कवींना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कवी वि. ग. सातपुते व कवयित्री घाणेकर यांनी केले. पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. आशा उबाळे यांनी स्पर्धकांचे स्वागत करून मराठी भाषा संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

या स्पर्धेत खेताराम परीयारिया, रा.वि. शिशुपाल, संतोष गाढवे, रमेश जाधव, सुजित कदम, मिनाक्षी शिलवंत, वृंदा भांबुरे, दाक्षायणी पंडित, ज्योती हमीने, संजय माने, अमोल सुपेकर, विनोद अष्टुळ, आशा यमगर, संजय जाधव आदी कवींनी सहभाग घेतला. कवींनी मानवी संवेदना, प्रेम, निसर्ग, दुःख, विरह तसेच सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या.

न्याय, ऊसतोड, कुटुंब पद्धती, झाड, माय मराठी, जगून घे थोडं, प्राण आहे मायभूमी, माझी शाळा – माझी मुले माझे हिरो यांसारख्या विविध विषयांवरील कविता सादर झाल्या. परीक्षक वि. ग. सातपुते यांनी आपल्या काव्य प्रवासातील अनुभव कथन करत तीन कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शनाने या काव्य स्पर्धेची सांगता झाली.

See also  राजकारणात महिलांना सक्षम करण्यासाठी  'इंदिरा फेलोशिप' : ससाने