बालेवाडी : केंद्रीय मंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य प्रकाश बालवडकर यांच्या वतीने दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे प्रदान करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम प्रकाश बालवडकर यांनी राबविला. या मदतीमुळे दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळण्यास हातभार लागणार आहे.
यावेळी प्रल्हाद सायकर, भाजपा उत्तर मंडलाध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, लहू बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, अनिकेत चांदेरे, सुभाष भोळ आदी उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी प्रकाश बालवडकर यांची ५१ हजारांची मदत
















