अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप, व्यापारी संघटना बाणेर आयोजित दहीहंडी उत्सव

बाणेर : अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप व्यापारी संघटना बाणेर आयोजित दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी गणराज चौक बाणेर येथे करण्यात आले आहे यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद तापकीर यांनी सांगितले.


गेल्या बारा वर्षापासून बाणेर येथे दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे.कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती खासदार मेधा कुलकर्णी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील जी फुलारी सर व रंजनकुमार शर्मा जॉईंट सिटी पुणे डॉ सचिन गांधी गायनाचार्य अरुण महाराज येवले संगीता अलंकार सुकलाल महाराज बुचडे, चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोडगी व  ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. विशेष सत्कार श्री संत तुकाराम महाराज पालखी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूर पर्यंत सर्व वारकरी सांप्रदाय व पालखी सोहळा व्यवस्थित जाण्याचे काळजी घेणारे ज्यांनी दिवस-रात्र मेहनत करून अपघात मुक्त वारी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे कोल्हापूर परिक्षेता चे  आई जी सुनीलजी फुलारी व पुणे सिटी ट्रॅफिकचे एसीपी सुभाष निकम व पीआय सुपे पाटील मॅडम दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवामध्ये नागरिकांनी व युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने प्रकाश तापकीर यांनी केले आहे.

See also  संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे निर्देश; पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील