सुसरोड डिएसके विद्यानगरी जवळ पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

सुस : सुसरोड डिएसके विद्यानगरी जवळ पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
सर्व्हिस रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. या परिसरातील चेंबरची झाकणे खचली असून यामध्ये मोठ्या वाहनांची चाके अडकून अपघात देखील होत आहे.

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पुणे महानगरपालिकेच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई केली जात नाही. या परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

सूस खिंडीतील पुलाच्या लगत असलेले दोन्ही महामार्गाकडे जाणारे सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर संघटिका ज्योती चांदेरे यांनी रस्ता दुरुस्त करून सुरक्षा योजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

See also  बालेवाडी येथील लक्ष्मी माता मित्र मंडळाने साकारला 'जसवंत थाडा' मंदिर देखावा