वारजे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण कारवाईची अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांकडून पाहणी

वारजे : पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या अतिक्रमण निष्कासन कारवाईची मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि  उपायुक्त थोरात यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नियमितपणे आणि प्रभावीपणे कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही नियोजनबद्ध पद्धतीने व तत्परतेने राबविण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले.

See also  शरद पवार,अजित पवार व सुप्रिया सुळे भेट नंतर दादा दिल्लीला रवाना