शरद पवार,अजित पवार व सुप्रिया सुळे भेट नंतर दादा दिल्लीला रवाना

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी भेट घेतली. त्यानंतर प्रतापराव पवारांच्या बाणेरच्या घरी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित आले. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.

प्रतापराव पवारांच्या घरी दिवाळीनिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्रित जमले होते. यावेळी शरद पवार, अजित पवार, त्याचबरोबर सुप्रिया सुळे देखील हजर होते. यातच आज प्रतापराव पवार यांच्या पत्नी आजारी देखील होत्या. तसेच प्रतापराव पवार यांचा वाढदिवस देखील असून तो साजरा करण्यासाठी एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे. यातच प्रतापराव पवार यांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, प्रतापराव पवार यांच्या घरी एकत्र आल्यानंतर व चर्चा केल्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

See also  महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित