माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे वेताळ टेकडीस भेट

पुणे : पुण्यातील ‘मिनी सह्याद्री’ म्हणून ओळख असलेल्या वेताळ टेकडीस माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली.
विकासाच्या नावाखाली जैवविविधतेने संपन्न असलेल्या या टेकडीचाही बळी देण्याचा घाट पुणे महानगरपालिकेने घातला आहे.

वेताळ टेकडी परिसरातील स्थानिकांचा तसेच पर्यावरणस्नेही संस्थांचा याला विरोध असून या प्रकरणी लक्ष घालून टेकडी वाचवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू, पुण्यातील पर्यावरणासाठी टेकड्या वाचवणाऱ्या पुणेकरांच्या बाजूने आम्ही आहोत असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित विविध पर्यावरण संस्थांच्या प्रतिनिधींना सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे तसेच विविध पर्यावरण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  समाजात संवेदनशीलता, दातृत्वाची इच्छा निर्माण व्हावी - चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ