वारजे वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

पुणे : वारजे वाहतूक विभागाच्या हद्दीत कै. जनार्दन पाटलु चौधरी उद्यान लगतच्या महावितरण मेन डीपी पर्यंत सुमारे ३५ मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ४ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

See also  कोथरूड मधील बेकायदेशीर जड वाहतूक विरोधात कारवाई होत नसल्याने आम आदमी पार्टीचे आंदोलन; सिमेंटचे मिक्सर पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात