बुधवार पेठेतील देवदासी महिलांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांचे सहकार्याने लायन्स क्लब ऑफ पुणे आय फाउंडेशन, स्वर्गीय राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित,माय माऊली केअर सेंटर पुणे, समता फाउंडेशन मुंबई व ससून नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

112 देवदासी महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. 8 महिलांची मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी नोंद झाली. त्या सर्व महिलांचे पूर्णतः मोफत ऑपरेशन केले जाईल या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे राजेंद्र परदेशी, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला.राजभाई मुछाल, संस्थापक अध्यक्ष माय माऊली केअर सेंटर पुणे लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज व डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन ला. विठ्ठलराव वरुडे पाटील आणि मंडळाचे कार्यकर्ते कर्मचारी व मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

See also  आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू - आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत