महाराष्ट्रात सर्वच पक्ष सत्तेसाठी एकमेकांशी तडजोड करताना दिसले पण जनहिताचे राजकारण आपच करू शकते – स्वराज्य संवाद सभा

पुणे : महाराष्ट्रातील राजकारण हे घराणेशाही भावकी आणि खोके- बोके यामध्ये गुरुफटले गेले असून जनतेचा आवाज प्रस्थापित विरोधी पक्षांच्या माध्यमातूनही उमटत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीच जनहिताचे राजकारण करू शकते असे आप चे अजित फाटके पाटील यांनी स्वराज्य संवाद सभेदरम्यान सांगितले.

आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी आठ जिल्ह्यातून जाणारी स्वराज्य यात्रा काढली होती. आता त्यानंतर प्रभाग पातळीवरती संवादासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी फुले वाडा येथे सभा घेण्यात आली.

महाराष्ट्र मध्ये चार वर्ष सर्वचपक्ष हे एकमेकांशी सत्तेसाठीच्या तडजोडी करताना दिसले आहेत. त्यामध्ये कुठली विचारधारा अथवा समान कार्यक्रमही दिसत नाही. त्यामुळे एखाद्या सत्ताधारी पक्षाला मतदारांचे प्रश्न सोडवण्यास अपयश आल्यावर पर्याय म्हणून असणारे विरोधी पक्ष हेही हा प्रश्न सोडवत नाहीत असा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. एकमेकांची उणिदुणी काढणे, शाब्दिक कुरघोडी करणे यामध्येच हे सर्व नेते मग्न आहेत. प्रस्थापित पक्ष आपले प्रश्न सोडवेल ही श्रद्धा भाबडी ठरेली आहे. आता जनतेने आपला आवाज उठवणाऱ्या आम आदमी पार्टी याला संधी देण्याची गरज आहे. दिल्ली मधली कामे ही प्रत्यक्षामध्ये दिसलेली आणि जगभर कौतुक झालेली अशी असून गुजरात मॉडेल प्रमाणे ती फसवी नाहीत. महिलांसाठी मोफत बस योजना, मोफत उत्तम शिक्षण योजना घरोघरी घरपोच कागदपत्र सेवा, मोफत वीज अशी पंजाब आणि दिल्लीमध्ये केलेल्या कामांची मोठी यादी आहे असे यावेळी जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

फुलेवाडा परिसरातील जनतेचे राहणीमान उंचावण्याचे सर्व प्रयत्न आम आदमी पार्टी करेल असे आश्वासन यावेळेस शेखर ढगे यांनी दिले.
आनंद अंकुश यांनी सरकारी तिजोरीत जमा होणारा कर हा मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाकडूनच जमा होत असल्याने तो सरकारने कल्याणकारी कामांसाठी राबवावा अशी मागणी केली.
तरुणांना हातास काम ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी उत्तम कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इरफान रोड्डे यांनी केले. रुबीना काझमी यांनी दिल्ली मॉडेलमुळे महिलांचे सक्षमीकरण झाल्याचे सांगितले.

See also  पुणे महानगरपालिकेत महापौर आम आदमी पार्टीचा - सुदर्शन जगदाळे शहर अध्यक्ष यांचा  संकल्प, आम आदमी पार्टी आघाडी विस्तार व पदग्रहण सोहळा