राजस्थान मधील दोन फरार अतिरेकी पुणे पोलिसांकडून अटक

एका वाहन चोरीच्या प्रकरणात नाकाबंदीच्या दरम्यान दोघांना ताब्यात घेतलेले आरोपी ते फरार अतिरेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.इम्रान खान आणि मो. युनूस साकी अशी या दोन संशयितांची नावे आहेत.राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले राजस्थानमधील दोन अतिरेकी गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात लपवून बसले असल्याचे उघडकीस आले. दरम्यान अतिरेकी पकडणाऱ्या अमोल नजन, प्रदीप चव्हाण, बालारफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शीतकाल, डीसीपी सुहेल शर्मा, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कुलकर्णी आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त यांच्या विशेष कौतुक सत्कार करण्यात आला.

कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे पावणे तीन वाजता त्यांनी ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर त्यांना घरझडतीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले. कोंढव्यातील त्यांच्या घरझडतीत पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. सुरुवातीला ते वाहन चोर असल्याचा संशय होता.

त्यांच्याकडे सायंकाळी चौकशी केली जात असताना ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांच्याकडील लॅपटॉपची तपासणी केल्यावर ते देत असलेली माहिती आणि त्यातील कागदपत्रे यात विसंगती आढळून आली. त्यामुळे हे दोघेही देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आल्याने शहर पोलिसांनी ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला कळविली. एटीएसचे पथकही कोथरुड पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर या दोघांना शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आणण्यात आले. स्वत: पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा ते मुळचे मध्यप्रदेशातील असून त्यांनी राजस्थानमधील चितोढगड या ठिकाणी गुन्हा केला होता. त्या ठिकाणी एनआयएने कारवाई केली होती. त्यात काही स्फोटके सापडली होती. त्या गुन्ह्यात हे दोघे संशयित होते. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींनी त्यांना फरार घोषित केले आहे. त्यांना पकडणार्‍यास प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असल्याची माहिती समोर आली.

See also  एच ई एम आर एल मधील शास्त्रज्ञ संतोष कुमार यांचे निधन झाले.

राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेले दीड वर्षे पासून ते पुण्यात राहत आहेत.
त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेले दोघे मध्यप्रदेशमधील रतलामचे असून त्यांनी राजसथानमध्ये गुन्हा केला होता.