कर्तव्यदक्ष कोथरुड पोलिसांचा सर्वांना अभिमान! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दोन्ही जिगरबाज पोलिसांचे अभिनंदन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्याची ग्वाही

कोथरूड : कोथरुड परिसरात संशयित दहशतवाद्यांना पकडणारे पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नाझण यांच्या जिगरबाज कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात होत असून, कर्तव्यदक्ष पोलिसांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्याची, ग्वाही यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

कोथरुड पोलीस स्टेशनचे शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझ मंगळवारी रात्री कोथरुड भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांना तीनजण संशयास्पदरित्या वावरत होते. यावेळी पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाद यांनी तिघांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.‌ यावेळी आरोपी इम्रान खान, युनुस साकी यांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथीदार तेथून पसार झाला.

यानंतर पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझ यांनी दोघाही आरोपींच्या घराची कसून झाडाझडती घेतली असता, त्यांच्या घरातून एक काडतूस, चार मोबाइल संच, लॅपटॉप जप्त करण्यात आला. चौकशीत खान, साकी आणि साथीदाराविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता हे उघड झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. एनआयएने त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यान, पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझ यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही दोन्ही जिगरबाज पोलिसांचे अभिनंदन केले असून, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्याची ग्वाही यानिमित्ताने केली आहे.

See also  २२९ वा "सॅटर्डे क्लब"पुणे मेट्रोमध्ये साजरा