मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाट ते बोतरवाडी खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी शिवसेनेची मागणी

पिरंगुट : मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनची मुळशी तालुक्यात अवस्था बिकट झाली आहे सगळे रस्ते खड्डेमय झाले आहे . मुळशी तालुक्यांतील काशिग स्टँड ते शेळेके वाडी रोड तसेच पिरंगुट घाट ते बोतर वाडी या रोडवर प्रत्येक ठिकाणी खड्डे पडून रस्ते खड्डेमय झाले आहेत.या रस्त्याची लवकरात लवकर यांची दुरुस्ती करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करता येईल असे निवेदन संबधित अधिकारि मुंडे यांना देण्यात आले.

तसेच पिरंगुट घाट ते बोतरवाडी उरवडे या मार्गे ठीक ठिकाणीं गतिरोधक बसवावेत या मार्गे मोठ्या प्रमाणात पर्यटक ये जा करत असतात तसेच या रोडवर बरेच ठिकाणीं शाळा आहेत. त्यामूळे गतिरोधक महत्वाचे आहेत अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक अमित कुडले, भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य नामदेव टेमघरे , कैलास मारणे, उपसरपंच बंडु भाऊ साळुंखे,उपतालुका समन्वयक समीर शिंदे, विभाग प्रमुख प्रदीप बोंद्रे वैभव पवळे मोहन आवळे सागर गुजर, चंद्रकांत शिंदे,रामदास कुंभार,दत्ता काळभोर,अरुण वीर ,राहुल वीर सूरज साळुंखे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  खडकवासला विधानसभा मतदारसंघात स्वीप समितीचे मतदार जागृती अभियान