एल अँड टी ने बालेवाडी सर्वे नंबर 29 मध्ये बांधलेली निकृष्ट पाण्याची टाकी; गळती मधून लाखो लिटर पाणी वाया

बालेवाडी : बालेवाडी येथील सर्वे नंबर 29 जकात नाका येथील एल अँड टी कंपनीने बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट बांधकामा संदर्भामध्ये मुख्य पाणीपुरवठा अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या बालेवाडी गावातील एल अँड टी कंपनीने सर्वे नंबर 29 जकात नाका येथील पाण्याच्या टाकीचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जेचे केले आहे . यामुळे टाकी वापरात आल्यानंतर अनेक ठिकाणी गळत आहे. निकृष्ट दर्जाची टाकी बांधल्यामुळे या ठिकाणी लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असून ही टाकी धोकादायक झाली आहे.

निकृष्ट दर्जाची टाकी बांधण्यात आले असून याची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवासी वाहतूक संघटना पुणे शहराध्यक्ष दिलीप बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे शहराचे युवा अध्यक्ष संदीप बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते उमेश सत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव कदम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवेदन पत्र देण्यात आले.

See also  पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार,किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा